Friday, July 22, 2011

आम्रपाली आणि 'वैशाली की नगरवधू'


मागे आम्रपाली  नावाच्या जुन्या हिंदी सिनेमावर एक नोंद लिहिली होती.
सध्या आम्रपालीच्या जीवनावर लिहिलेली एक जाडजूड हिंदी कादंबरी हाती लागली आहे. लेखक आहेत आचार्य चतुरसेन आणि कादंबरीचं नाव आहे '
वैशाली की नगरवधू'.

तब्बल साडेचारशे-पाचशे पानांची ही कादंबरी आहे. भाषा प्रौढ, संस्कृतनिष्ठ व रसाळ आहे. इतिहासाला, वस्तुस्थितीला वैभवाचा, इंद्रधनुषी रंगांचा लेप दिलेला आहे. शिवाजी सावंतांच्या 'मृत्यूंजय'ची आठवण होते. तसंच अतिरंजित वातावरण आणि अलंकारिक भाषेत विचार करणारी पात्रं.
आम्रपाली नावाची एक खरीखुरी स्त्री एका विश्वसनीय स्थळकाळात वावरते-जगते असा अनुभव कादंबरीत नंतर तरी येईल का, या शंकेची पाल चुकचुकली आहे.
नंतर सविस्तर
.

No comments:

Post a Comment