Monday, May 30, 2011

शुद्धलेखन ठेवा खिशात : अरुण फडके यांची पुस्तिका


       गणवे की गणवे?
       आधारित की आधारीत?
       बुद्धिवान की बुद्धीवान?
       विवाहित की विवाहीत?
       नीती की निती?
       टिप्पणी की टिपण्णी?

       अंधूक की अंधुक?

अशा शंकांवर मात करून ज्यांना नीटनेटकं मराठी लिहावंसं वाटतं, त्यांनी जरूर वाचावी व वापरावी अशी मार्गदर्शिका म्हणजे अरुण फडके संकल्पित व संपादित शुद्धलेखन ठेवा खिशात  ही पुस्तिका (पाचवी आवृत्ती, २०१०. किंमत रु. ३५/-). खरं तर हा एक लघुकोशच आहे ('लघू'; पण 'लघुकोश'). यात नेहमीच्या वापरातले सुमारे ११,००० शब्द आहेत, पण खरोखर खिशात बाळगता येईल इतकी ही पुस्तिका चिमुकली असून खिशात बाळगावीशी वाटेल इतकी तिची छ्पाई प्रसन्न आहे. "शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे" हे या पुस्तिकेचं ब्रीद आहे. 

प्रकाशनाचा पत्ता: 
अंकुर प्रकाशन, ६०२ - चित्रकूट सहनिवास, डॉ. आंबेडकर मार्ग, ठाणे (पश्चिम), ४०० ०६१
दूरध्वनी : २५४७ ४६२२

अरुण फडक्यांच्या शुद्धलेखनविषयक कामाबद्दलची ही एक लहान नोंद.


1 comment:

  1. आपण आपली प्रतिक्रिया अतिशय नेटक्या शब्दात मांडली आहे. आपली प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. आमच्या इतर पुस्तकांबद्दल जाणून घेण्यासाठी पाहा www.ankurpublications.com
    वृषाली फडके, प्रकाशिका, अंकुर प्रकाशन, ठाणे,

    ReplyDelete