Monday, May 23, 2011

Kashmakash (कश्मकश): A Film by Rituparno Ghosh



श्मकश  हा सिनेमा म्हणजे रितुपर्णो घोष यांच्या नौकाडुबी  या मूळ बंगाली चित्रपटाचं हिंदी 
रूपांतर आहे. रैमा सेनरिया सेन, जिशू सेनगुप्ता, प्रसनजीत चॅटर्जी यांनी यात मुख्य कामं केली आहेत. 
हा सिनेमा रवींद्रनाथ ठाकूरांच्या (टागोरांच्या) नौकाडुबी  या नावाच्याच एका कादंबरीवर आधारित आहे, असं म्हटलं गेलं आहे. स्वत: दिग्दर्शकाने सिनेमाच्या सुरुवातीला तसा श्रेयोल्लेख केला आहे. परंतु हा सिनेमा बघून अनेक प्रश्न पडतात.
रवींद्रनाथांनी खरंच अशी रसिकवृंदाच्या चाकोरीबद्ध अपेक्षा पूर्ण करणारी, गोड शेवट असणारी, भावनाविव्हळ कादंबरी लिहिली होती का? की घोष-घई (निर्माता सुभाष घाई) जोडगोळीने (हिंदी 
रूपांतरापुरती) ती कादंबरी अशा स्वरुपात पडद्यावर साकार केली आहे? 
कश्मकश मधे सतत वाजणारं आक्रमक पार्श्वसंगीत मूळ बंगाली सिनेमातही आहे का? प्रत्येक गंभीर प्रसंगाचा हे संगीत कब्जा का घेतं? ही घोषांचीच करणी आहे की घईंची? 
प्रत्येक पात्र निर्वाणीच्या क्षणी खांबाला वा पलंगाला टेकून का उभं राहतं?
गतकाळ उभा करू पाहणार्‍या सिनेमातली प्रत्येक चौकट अतिनेत्रसुखद असायलाच हवी का?

हेमनलिनी (रैमा सेन) आणि नलिनाक्ष (प्रसनजित चॅटर्जी) वारंवार 'जख्म' आणि 'चोट' या दोन गोष्टींत फरक करतात. हे सुभाष घईंचं भाषांतर आहे की घोषांचा अन्वयार्थ की रवींद्रनाथांचं सर्जन? 
कश्मकश चं यश हेच की तो आपल्याला असे प्रश्न विचारायला भाग पाडतो. बाकी त्यात काही नाही.  

'इंडिया टुडे'मधील या सिनेमाचं कौतुकपर परीक्षण इथे आहे. चित्रपटाची गोष्ट सांगून टाकणारं व अनुकूल अभिप्राय देणारं अजून एक इंग्रजी परीक्षण इथे आहे.


रोबी ठाकूर

No comments:

Post a Comment